आचारसंहिता उल्लंघनात आम आदमी पार्टी आघाडीवर

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा मतदानाच्या तारखा जवळ येत आहेत तसे मतदारांना आकर्षिक करण्यासाठी सर्वच पक्ष निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेचा भंग करत मतदारांना आश्वासनांची खैरात करत आहेत.मात्र या सार्याह पक्षात आचारसंहिता भंग केल्याबद्दल सर्वाधिक एफआयआर अरविद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीविरोधात दाखल झाले आहेत.

आम आदमी पार्टी प्रथमच निवडणूक रिंगणात उतरली असून त्याच्याविरोधात २१ नोव्हेंबरपर्यंत १०० एफ आयरआर दाखल केले गेले आहेत. दुसर्‍या क्रमांकावर भाजप असून तिसर्‍या क्रमांकावर काँग्रेस आहे. मुख्य निवडणूक कार्यालयातील अधिकार्‍यानी दिलेल्या माहितीनुसार २१ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन व फोनवरून आचारसंहिता भंगाच्या ७०८६ तक्रारी नऊ जिल्ह्यातून दाखल करण्यात आल्या त्यातील ६९६० निकाली काढण्यात आल्या आहेत तर १२६ तक्रारींबाबत सुनावणी सुरू आहे.

यंदा तक्रार करणार्‍यानी इंटरनेटचा वापर अधिक केला आहे.४५५८ तक्रारी इंटरनेटवरून दाखल केल्या गेल्या आहेत. तक्रारींची शहानिशा करून ३५९ प्रकरणात एफआयआर दाखल झाले आहेत.पैकी १०० आम आदमी पार्टी विरोधात आहेत.

Leave a Comment