मुंबई- बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यांची जोडी चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात आता कुशाल टंडन या घरात परतला आहे. कुशालसोबत घरातल्या मंडळींला त्यांच्या कुटुंबाकडून काही गिफ्ट पाठवण्यात आले आहेत. यामध्येच विशेष गिफ्ट म्हणजे अरमानच्या आईने आपल्या भावी सूनेसाठी म्हणजेच तनिषा मुखर्जीसाठी विशेष गिफ्ट पाठवले आहे. यामुळे आता वेगळीच चर्चा रंगली आहे.
एका इंटरटेंमेन्ट वेबसाईटमधील बातमीनुसार अरमानची आई निशी कोहलीने कुशालसोबत एक विशेष मॅसेज पाठवला. त्या म्हणाल्या की “तनिषाला सांग की ती मला खूप आवडते, ती खूप गोड मुलगी आहे”. निशी कोहलीने कुशालला हे सुद्धा सांगितलं की “जेव्हा तु तनिषाला भेटशील तेव्हा तिला आलिंगण देऊन माझ्यातर्फे किस कर”. यामुळे आता लवकरच तनीषा कोहली कुटूंबाची सून बनणार अशी चर्चा यानिमित्तााने रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तनिषा अरमानची घरात खूपच काळजी घेत असते. तिच्या या केअरिंग नेचरमुळेच अरमानची आई खूपच प्रभावित झालेली आहे. त्याघमुळेच तिने ‘टॅन-मॅन’ अरमानची बायको म्हणून त्यांनी तनिषाचा स्वीकार केला आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यांतनतरच या दोघांचे खरे प्रेम आहे की नाही हे समजून येईल.