विद्या, माधूरीशी कॉम्पीटेशन नाही- हुमा कुरेशी

‘इश्किया’ मध्ये विद्या बालनने सेक्सुएलिटी स्ट्रॉंग अंदाजात प्रदर्शीत करण्यात आली आहे. त्यामुळे मी कधीच विद्या बालनने अथवा सुपरस्टार माधूरी दीक्षित यांच्याे अभिनयाची बरोबरी करण्याचा विचार करीत नाही. गेल्या काही दिवसांत त्यांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली यामुळे मी खूपच खुश आहे असे मत अभिनेत्री हुमा कुरेशी यांनी व्यक्त केले.

याबाबत अधिक बोलताना हुमा कुरेशी म्हणाली, आगामी काळात येत असलेल्या ‘इश्किया’ हा सिनेमा रॉ आणि इंटेंस वर आधारित आहे. या सिनेमात मी अरशद सोबत काम करीत आहे. यामध्येर काही इंटिमेट सीन्सत आहेत. हे सीन सिनेमासाठी आवश्यक असल्याने मी केले आहेत. त्यामधून मी अंगप्रदर्शन केले असे म्हणने चुकीचे आहे.

तसे पाहिले तर अभिनेत्री रिचा चड़डा ही एक गुणी अभिनेत्री आहे. ज्याआवेळी माझा एखादासिनेमा रिलीज होतो तेंव्हाक ती मला मैसेज करून सांगत असते. पण गेल्या काही दिवसात तिचा ‘फुकरे’ आणि ‘रामलीला’ हा सिनेमा प्रदर्शीत झाला आहे. काही जण आमच्या अभिनयाची तुलना करीत आहेत. मात्र आता आम्ही दोघीजण पण चांगला अभिनय करीत आहोत. आगामी काळात माझे दोन सिनेमे येत असून मी त्याची तयारी करीत असल्याचे हुमा कुरेशीने स्पष्ट केले.