मुशर्रफ विशेष न्यायालयाच्या स्थापनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधातील देशद्रोहाचा खटला चालविण्यासाठी पाक सरकारने विशेष न्यायालयाच्या स्थापनेची घोषणा केली असून या स्थापनेस मुशर्रफ सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले गेले आहे.

मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग पार्टीचे प्रवक्ते आसिया इशाक या संदर्भात माहिती देताना म्हणाले की विशेष न्यायालयासाठी ज्या तीन न्यायाधीशाची नेमणूक करण्यात येणार आहे त्यांचा दृष्टीकोन मुशर्रफ यांच्याबाबत पूर्वग्रहदूषित आहे. त्यामुळे खटल्याची सुनावणी निःपक्षपातीपणे होणे अशक्य आहे. सरकारने त्यांना हवा तो निकाल दिला जावा यासाठीच या न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. त्याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत.

मुशर्रफ यांच्यावर नोव्हेंबर २००७ मध्ये आणीबाणी जाहीर केल्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालविला जाणार असून पाकिस्तानात माजी राष्ट्रपतींविरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली प्रथमच असा खटला चालणार आहे.

Leave a Comment