मला फिरायला खूप आवडते-करीना

तसे पाहिले तर बॉलीवूड सेलिब्रिटीजचे लाईफ म्हणजे नेहमीच बिझी लाईफस्टाईल असते. या शेडयूलमधून सुध्दा अभिनेत्री करीना कपूरला मात्र स्वतासाठी वेळ देणे महत्त्वाचे वाटते. नेहमीच तिला मनसोक्त, स्वच्छंदपणे फिरायला आवडते. त्यासाठी ती कामातून देखील आवर्जून वेळ काढत असल्याचे करीनाने प्रसारमाध्यरमाशी बोलताना स्प्ष्ट केले.

‘गोरी तेरे प्यार में’ हा तिचा सिनेमा येत आहे. त्यानिमित्ताने प्रसारमध्यामाशी बोलताना करीना म्हनाली, ‘माझा ‘मूड’ नेहमीच ‘झक्कास’ असतो. ‘मनसोक्तपणे फिरण्यासाठी वेळ काढणे’ ही माझी अगदी बालपणापासूनची हौस व सवय मी आजही सोडलेली नाही. ‘रिफ्यूजी’पासूनच्या माझ्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत मी मूळची फिरण्याची हौस जरा जास्तच विकसित केली आहे. म्हणजे, एखाद्या ठिकाणी दुस-यांदा-तिस-यांदा गेल्यावर त्याकडे मी अगदी नवीन दृष्टीने पाहते. मला वाटते, तशा सवयीने माझा मूळचा अवखळपणा व आजचा परिपक्वपणा यांची सांगड घातली जाते.’

माझे फिरणे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे, शुटिंगच्याा निमित्ताने देश-विदेशात दूर-दूर जाणे होते व दुसरे म्हणजे आवर्जून सुट्टी घेऊन जुन्या मित्रमैत्रिणींसोबत आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे. माझे शाळेपासूनचे मित्र आजही माझ्यासोबत आहेत व त्यांच्यात असताना मी माझा पेशा अर्थात मी अभिनेत्री असणे कधी व कसे विसरते हेच समजत नाही. पण ते माझ्या जरा जास्तच पथ्यावर पडते असेही करीनाने यावेळी सांगितले.

‘गोरी तेरे प्यार में’ च्या शुटसाठी ‘रिफ्यूजी’नंतर ब-याच वर्षांनी गुजरातमधील भूज येथे गेले. पूर्वीचे भूज एक साधे गाव होते. आठवडय़ातून दोनदा फक्त मुंबईवरून विमान जाई. तेव्हा राहण्याच्याही फारशा सुविधा नव्हत्या. पण फार पूर्वापार मला फिरण्याची सवय असल्याने असल्या अडचणींचे कधीच कुठे काही वाटत नाही. पण आज भूज कमालीचे बदलले असल्याचेही करीनाने स्पष्ट केले.

Leave a Comment