फोर जी मोबाईल्स १०० डॉलर्समध्ये मिळणार

लेटेस्ट फोर जी तंत्रज्ञान असलेले मोबाईल्स येत्या १८ महिन्यात १०० डॉलर्स म्हणजेच भारतीय ६२०० रूपयांत ग्राहकांना उपलब्ध होतील अशी खात्री मोबाईल चीपसेट उत्पादक ब्रॉडकॉमचे वरीष्ठ संचालक मायकेल सिव्हिएलो यांनी व्यक्त केली आहे. मात्र हे मोबाईल सेट बँडॅड कंपन्यांऐवजी स्थानिक आणि नॉन ब्रँड कंपन्याच बाजारात आणतील असेही त्यांचे म्हणणे आहे.

सध्याच्या थ्री जी तंत्रज्ञानापेक्षा फोर जी तंत्रज्ञान किमान पाचपट वेगवान आहे. मात्र त्यांचे हँडसेट महाग आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करता येणारा सर्वात स्वस्त हॅडसेट भारतात किमान १८ हजार रूपयांच्या घरात आहे मात्र अन्य हँडसेट ४० हजार रूपयांच्या पुढेच आहेत. या उलट थ्रीजी तंत्रज्ञानाचा वापर असलेले हँडसेट ४ हजार रूपयांपासून उपलब्ध आहेत.

सिव्हिएलो यांच्या मते ज्या कंपन्या मार्केटिंगवर खर्च करणार नाहीत तसेच प्रमोशनल कँपेनिंग करणार नाहीत अशा स्थानिक कंपन्याच असे स्वस्त हँहसेट बाजारात आणतील. कारण या तंत्रज्ञानाची मागणी वाढत चालली आहे व रिलायन्स जिओ इन्फोकॉम सारख्या कंपन्या या क्षेत्रात मोठी भूमिका बजावू शकतात. एकदा तंत्रज्ञान उपलब्ध झाले की किती मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते यावर किमती कमी जास्त होत असतात. उत्पादन जादा असेल तर किमती कमी होतात.

Leave a Comment