मुंबई : उसाच्या दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. साखरेचे दर जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत उसाला भाव देता येणार नसल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री पथ्वीयराज चव्हाोण यांनी केली आहे.

गेल्याम काही दिवसांपासून बाजारात साखरेचे दर पडले असल्याने शेतक-यांच्या उसाला किती दर द्यायचा, याबाबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. उसाचे उसाला एफआरपी प्रमाणे दर देता येतील का याबाबतही विचार सुरु असल्याचे मुख्यत्र्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, साखर उद्योगाबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तर उसाच्या दराबाबत २४ नोव्हेंबरची डेडलाईन न पाळल्यास सरकारला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यावमुळे आता आगामी काळात सरकार व कारखान्यालकडून उसाचे दर ठरणार की नाही यावरून बरेचसे वादळ उठले आहे.