
श्रीनगर – केंद्र सरकार केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प थंड वाळवंट आणि जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणार्या लडाख भागात उभारणार असून या प्रकल्पातून ५ हजार मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकणार आहे. या प्रकल्पासाठी किमान २० हजार एकर जागा आवश्यक आहे आणि त्यासाठी जागा निश्चित करण्यास सुरवात झाली असल्याचे समजते.


