जगन मोहन यांना ममता दीदींचा पाठिंबा

कोलकत्ता – आंध्र प्रदेशाच्या विभाजनाला विरोध करणारे वाय.एस.आर. कॉंग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांनी काल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि त्यांनी तेलंगणाच्या निर्मितीला विरोध करावा, असे आवाहन केले. ममता बॅनर्जी यांनी जगन मोहन रेड्डी यांना आपला पूर्ण पाठींबा असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर जगन मोहन रेड्डी हा आपला धाकटा भाऊ आहे, त्याला पाठींबा देणे हे आपले कर्तव्य आहे असे त्या म्हणाल्या.

जगन मोहन रेड्डी यांनी तेलंगण निर्मितीमध्ये केंद्र सरकार कशी मनमानी करत आहे हे विषद केले. राज्य विधानसभेची मंजुरी न घेताच केंद्र सरकारने विभाजनाचा निर्णय घेतला ही सरकारची चूक असल्याचे ते म्हणाले. छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड ही तीन राज्ये निर्माण करताना वाजपेयी सरकारने सर्व पक्षांचे एकमत असल्याची खात्री करून घेतली होती, याकडे जगन मोहन रेड्डी यांनी ममता बॅनर्जी यांचे लक्ष वेधले.

रेड्डी आणि बॅनर्जी यांच्या या बैठकीत कॉंग्रेस आणि भाजपा पासून दूर असणार्‍या पक्षांची ङ्गेडरल ङ्ग्रंट नावाची आघाडी स्थापन करण्याबाबत विचार विनिमय झाल्याचेही वृत्त आहे. या आघाडीमध्ये प्रामुख्याने प्रादेशिक पक्ष असावेत, अशी त्यांची कल्पना आहे. ममता बॅनर्जी यांनी मात्र या संबंधात ङ्गारशी सखोल चर्चा झाली नसल्याचे सांगितले. या विषयावर नंतर विचार केला जाईल, असे त्या म्हणाल्या.