उत्तराखंड सरकारचे रामदेव बाबांवर ८१ खटले

सिमला – उत्तराखंड राज्य सरकारने काल बाबा रामदेव आणि त्यांच्यातर्ङ्गे चालवले जाणारे पतांजली योगपीठ यांच्यावर निरनिराळे ८१ खटले दाखल केले. यातले २९ खटले जमिनीचा अवैध ताबा घेतल्याच्या प्रकाराचे असून ५२ खटले कर चुकवेगिरी केल्याचे आहेत. मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी ही माहिती दिली.

रामदेव बाबा यांना आणि त्यांच्या विश्‍वस्त संस्थेला सहकार्य करणारे सरकारी अधिकारी कोण, याचाही तपास सरकार करत आहे आणि अशा अधिकार्‍यांवरही कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. या संबंधात सरकारी अधिकारी दोषी असतील तर त्यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी बजावले.

रामदेव बाबांचे आर्थिक व्यवहार आणि जमिनीचे कबजे यांची चौकशी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकार्‍यांनी केलेल्या या चौकशीचा अहवाल सरकारला सादर झाला असून त्याच्या अनुरोधाने हे खटले दाखल करण्यात आले आहेत.

रामदेव बाबा यांनी विद्यापीठ उभारण्यासाठी म्हणून ३८७ एकर जमीन घेतली. परंतु त्यातल्या केवळ २० एकरांवर विद्यापीठ उभे आहे. या शिवाय ङ्गुड पार्कच्या नावाने ८४ एकर जमीन घेण्यात आली आहे. त्याशिवाय रामदेव बाबांच्या विश्‍वस्त संस्थांनी १० कोटी रुपयांचा कर चुकविला आहे, असेही अहवालात म्हटलेले आहे.

Leave a Comment