सैफसाठी करीनाने केली ११ तास ड्राइव

अभिनेता सैफ अली खान पत्नी करीनासाठी केलेल्या कामाची जाहीरपणे चर्चा करण्याचा कधीच कमीपणा वाटत नाही. करीनाचे देखील तसेच आहे ती सुध्दा सैफसाठी काही केले असेल तर सांगायला विसरत नाही. जीवनातील प्रत्येक खास क्षण ती पति सैफ अली खान सोबत शेयर करण्याचा प्रयत्न करीत असते. पती सैफसोबत काही वेळ घालवता यावा म्हणून करीनाने काही दिवसांपूर्वी ११ तास ड्राइव केले होते.

गेल्यावर्षी एका सिनेमाच्या कामानिमित्ताने बेबो शूटिंगसाठी कश्मीरला गेली होती. त्यावेळी सैफ अली खान काही काळासाठी तिच्यापासून दूर राहत होता. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्या नंतर सैफला भेटण्यासाठी करीनाने ११ तास ड्राइवींग केले होते. त्यानंतरच तिला सैफचा वाढदिवस एकत्रित साजरा करता आला होता.

करीनाने सैफसाठी ११ तास ड्राइवींग केल्याचे नुकतेच सांगितले. एवढेच नव्हे तर विवाहापूर्वी चार वर्ष एकमेकांच्या प्रेमात राहून त्यांनी विवाह देखील केला. तसे पाहिले तर करीनासाठी सैफने केलेले सर्व काही ती कधीच विसरत नाही. काही दिवसांपूर्वी करीना शूटिंगमध्ये व्यस्त असल़्यानंतर सैफला भेटण्याासाठी ती जात नव्हती तर तिला भेटण्यासाठी सैफच येत होता. हे सांगायला मात्र करीना विसरली नाही.