सचिन आता शालेय पाठ्यपुस्तकात

मुंबई – मास्टर ब्लास्टर व क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्यावरचा एक धडा शालेय पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करण्याचा विचार महाराष्ट्र शासन करत असल्याचे राज्याचे शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.

दर्डा म्हणाले की या संदर्भात एक विशेष बैठक पुढील आंठवड्यात होत असून याच बैठकीत सचिन वरचा धडा कोणत्या इयत्तेच्या पुस्तकात समाविष्ट करायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र बहुदा तो दहावीच्या पाठ्यपुस्तकात घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. दर्डा म्हणाले की सचिनवरील धड्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्याच्यापासून प्रेरणा मिळू शकेल. यापूर्वी चंदू बोर्डे आणि सुनील गावस्कर यांच्यावरील धडेही पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

जूनपासून सुरू होणार्‍या शैक्षणिक वर्षात सचिनवरील धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment