उपवास करा अधिक जगा

भारतातल्या महिलांमध्ये धर्मभोळी प्रवृत्ती ङ्गार असते आणि त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणावर उपवास करत असतात. त्यांच्यामध्ये अशक्तपणाचे प्रमाण जास्त असते आणि त्याचे कारण उपवास हेच आहे. असे बरेच डॉक्टर सांगत असतात. म्हणून अशक्त महिला डॉक्टरांकडे तपासण्यासाठी येतात तेव्हा त्यांना डॉक्टर मंडळी उपवास सोडण्याचा सल्ला देतात. आता लंडनमध्ये मात्र एक नेमके विरुध्द अर्थाचे संशोधन झाले आहे. त्यानुसार आठवड्यातून दोन दिवस उपवास करणारी व्यक्ती एकही उपवास न करणार्‍या व्यक्तीपेक्षा जास्त दिवस जगू शकते. असे आढळले आहे. एकंदरीत आठवड्यातून दोन दिवसाचे उपवास हे दीर्घायुष्यासाठी उपयुक्त ठरतात असे या संशोधनातून दिसून आले आहे.

प्रामुख्याने शारीरिक वजन कमी करणे, चरबी घटवणे, या गोष्टींसाठी उपवास उपयुक्त ठरतो हे नक्की कारण असे उपवास केल्याने कमी उष्मांक घेतले जातात आणि चरबी कमी होते. परंतु याही पलीकडे जाऊन हे दोन दिवसांचे उपवास हृदयविकार, मधुमेह इत्यादी अनेक विकारांवर गुणकारी ठरतात असेही दिसून आले आहे. एकंदरीत आठवड्यातून दोन दिवस पोटाला विश्रांती देणे हे अनेक रोगांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. ऍमांडा हॅमिल्टन या महिलेने या संबंधात प्रदीर्घ संशोधन केले असून आपले निष्कर्ष एका वैद्यकीय मासिकात गेल्याच महिन्यात प्रसिध्द केले आहे. तिचा तर असाही दावा आहे की, आपण सांगितल्या प्रमाणे खाण्याचा कार्यक्रम राबवला आणि त्याबाबतीत आपले नियम पाळले तर शरीराबरोबर मेंदूचेसुध्दा आरोग्य चांगले राहते. स्मरणशक्ती वाढत्या वयानंतरसुध्दा शाबूत राहते.

ऍमांडा हॅमिल्टन या आहारतज्ञ आहेत. त्यांनी काढलेल्या निष्कर्षावर काही डॉक्टरांनीही काम केलेले आहे. ब्रिटीश जर्नल ऑङ्ग डायबेटीस ऍन्ड कार्डिओ व्हॅस्क्युलार डिसीजेस या मासिकात याही डॉक्टरांचे निष्कर्ष प्रसिध्द झाले आहेत. त्यांनीही उपवासाचे अनेक ङ्गायदे मान्य केले आहेत. मात्र असा उपवास करताना आठवड्याचे दोन ठराविक दिवस ङ्गास्टिंग डेज म्हणून ठरवावेत आणि त्यादिवशी हलके अन्न खाणे त्याचबरोबर एक वेळचे जेवण रद्द करणे असे उपाय योजावेत. म्हणजे आरोग्याचा लाभ होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment