इन्शुलीन वाढवणारे हार्मोन

जेव्हा सामान्य माणूस खाल्लेली साखर पचवू शकत नाही तेव्हा त्याला साधारणतः मधुमेह झाला असे म्हणतात. साखर पचत नाही कारण साखरेचे पचन करणारे इन्शुलिन तयार होत नाही. ते स्वादुपिंडात तयार होत असते. ते तयार होण्याचे थांबले की सारी गडबड होते. आजपर्यंत तरी इन्शुलिन तयार करण्याची बंद पडलेली प्रक्रिया पुन्हा गतीमान करण्याचे औषध सापडलेले नाही. त्यामुळेच मधुमेहावर इलाज नाही. असे म्हटले जाते आणि मधुमेहींसाठी ही एक दुःखाची बाब आहे. आता मात्र स्वादुपिंडातील इन्शुलिन तयार करण्याची क्षमता पुन्हा जागृत करता येईल अशी आशा वाटावी असे संशोधन समोर आले आहे.

संशोधकांना एक असे हार्मोन सापडले आहे की जे बंद पडलेली इन्शुलिनची ङ्गॅक्टरी पुन्हा सुरू करू शकते. हार्वर्ड विद्यापीठातील संशोधक डग्लस मेल्टन यांनी यावर संशोधन केले असून आपले निष्कर्ष जाहीर केले आहे.त्यांच्या संशोधनानुसार आपल्या शरीराच्या यकृतामध्ये बेटॅट्रॉङ्गीन नावाचे एक हार्मोन असते. ते इन्शुलिनची निर्मिती करू शकते. अर्थात हा प्रयोग अजून उंदरावर सुरू आहे. तो उंदरांच्या बाबतीत पक्का झाल्यास त्यांची चाचणी माणसांवर घेतली जाईल आणि ते प्रयोग यशस्वी झाल्यास माणसालाही मधुमेहाशी सामना करता येईल. हे संशोधन पुढे आल्यापासून त्यावर भवति न भवति सुरू झाली असून अनेकांनी हे संशोधन मानवतेच्या इतिहासातले मोठे संशोधन ठरणार असल्याचे म्हटले आहे. कारण गेल्या कित्येक वर्षापासून इन्शुलिनची निर्मिती गतीमान करणारे औषधच सापडत नव्हते.

३७ कोटी लोक या विकाराने त्रस्त आहेत. त्यांना हे संशोधन म्हणजे वरदान वाटणार आहे. अर्थात या नव्या संशोधनाच्या माणसावरच्या चाचण्या सुरू व्हायला अजून दोन वर्षे लागणार आहेत आणि बेटॅट्रॉङ्गिन हे हार्मोन कृत्रिमरित्या तयार करावे लागणार आहे. ते तयार करण्याची पध्दती विकसित झाल्यानंतरच त्याचे औषध करून किंवा गोळी तयार करून मग ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात या नव्या क्रांतीकारक औषधाचा वापर सुरू होऊन मधुमेह आटोक्यात येण्यास कमीत कमी दहा वर्षे लागणार आहेत. या प्रयोगाचे निष्कर्ष सेल नावाच्या मासिकात प्रसिध्द करण्यात आले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment