सुष्मिता सेन, राणी, बिपाशाचा सत्कार

बंगाली सौंदर्यवतींचा पश्चिम बंगाल सरकराकडून नुकताच गौरव करण्यात आला आहे. त्यासमध्येा बॉलीवूड अभिनेत्री मौसमी चॅटर्जी, सुष्मिता सेन, राणी मुखर्जी, बिपाशा बासू आणि कोंकणा सेन शर्मा यांचा समावेश आहे. या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभादिवशी या पाच बंगाली अभिनेत्रींचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला पाच कन्या असे नाव देण्यात आले होते.यावेळी पाच अभिनेत्रींनी पुरस्काराकरिता धन्यवाद मानले आणि बंगाली असल्याचा मान असल्याचेही म्हटले. हा सत्कार सोहळा कोलकाता आंतरष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभाचे विशेष आकर्षण ठरला.

बॉलीवूडमध्ये विशेषता या पाच बंगाली कन्यांनी अभिनयाच्याा माध्य्मातून काही काळ गाजविला आहे. त्यांनी केलेला अभिनयामुळे त्यांचा सत्कार करणे गरजेच होते असे मत बंगाल राज्य सरकारच्या सुत्रांनी व्यक्त केले आहे. या सत्काचराबद़दल अभिनेत्री मौसमी चॅटर्जी, सुष्मिता सेन, राणी मुखर्जी, बिपाशा बासू आणि कोंकणा सेन शर्मा यांनी सरकाराचे आभार मानले आहेत.

Leave a Comment