सर्दी : सामान्य पण घातक विकार

अधूनमधून होणार्‍या सर्दीला वैद्यकीय शास्त्रात कॉमन कोल्ड असे म्हटले जाते. सर्दी झाली की, घसा खवखवायला लागतो, नाक वहायला लागते, शिंका येतात, काही वेळा डोळ्यातून पाणी सुद्धा येते. सर्दी सर्वांनाच होते, परंतु लहान मुलांना ती जास्त प्रमाणावर होते. जस जसे वय वाढत जाते तस तसे सर्दीचे प्रमाण कमी होते. परंतु निरोगी प्रौढांच्या आरोग्यावर सर्दीचा घातक परिणाम होऊ शकतो. सर्दी ही संसर्गजन्य असते. ती नेमकी कशाने होते हे १०० टक्के नेमकेपणाने सांगता येत नाही. परंतु सर्दी होण्यास दोनशे प्रकारचे व्हायरस कारणीभूत ठरू शकतात. त्यातील बहुतेक व्हायरसपासून होणारी सर्दी ही ङ्गार घातक नसते आणि कसलीही गुंतागुंत न होता आपोआप दुरुस्त होऊन जाते. सर्दीची काही लक्षणे आणि फ्ल्यूची लक्षणे जवळपास सारखी असतात.

अंग दुखणे, बारीक ताप येणे इत्यादी लक्षणांमुळे नेमका फ्ल्यू झाला आहे की सर्दी याबाबत संभ्रम निर्माण होतो. तेव्हा अशी लक्षणे दिसताच नेमकी तपासणी करून घेतली पाहिजे. कॉमन कोल्ड किंवा सर्दी या आजारावर कसलेही औषध नाही. सर्दी झाल्यानंतर ती एखाद्या औषधाने दुरुस्त झाली आहे असे होत नाही. तरी लोक औषधे घेतात. त्या औषधांमुळे सर्दीच्या काही लक्षणांवर इलाज होतो. उदा. डोकेदुखी थांबते, ताप कमी होतो. पण हा इलाज मूळ सर्दीवरचा नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

सर्दी साधारणत: ७२ तासाने किंवा काही प्रकारात आणखी २४ तासांनी आपोआप दुरुस्त होऊन जाते. परंतु जाता जाता ती आपल्या शरीरातल्या काही संस्थांवर परिणाम करून जाते. म्हणून प्रत्यक्षात सर्दीमध्ये ङ्गार त्रास होत नसला तरी वारंवार होणार्‍या सर्दीमुळे विविध संस्थांवर होणार्‍या परिणामाने नंतर त्याला त्रास होऊ शकतो. म्हणून सर्दी होण्याची वाट पाहण्या-पेक्षा तिला प्रतिबंध केला पाहिजे. प्रतिबंध करण्याचा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे विश्रांती घेणे.

सर्दी झाल्यानंतर शरीराला विश्रांती आवश्यक असते म्हणून ती घेतली पाहिजे. पण तिचे परिणाम आपल्या शरीरावर होऊ नयेत म्हणूनही ती आवश्यक असते. त्याशिवाय सर्दी झाल्यानंतर आपण ङ्गार ङ्गिरायला लागलो, लोकांत मिसळायला लागलो तर लोकांना सर्दी होण्याची शक्यता असते. डॉक्टर मंडळी सध्या गरम पाण्याच्या वाङ्गा घेणे हा सर्वात सोपा उपाय सांगत असतात. सर्दी झाल्यास तो जरूर अवलंबावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

4 thoughts on “सर्दी : सामान्य पण घातक विकार”

  1. omkar abhay ramdasi

    Mla sardi zali kiva tap ala ki naktun rkt yete ani te nakatun jwalamukhitun ras js bher yeto tse bher yete thmbt nhi tr yavr khi ghrguti upay ahe ka???
    Plg reply its argent

  2. Sir mala 2warshapasun sardicha trass hote ahe.sakali utle ki shinka yene suru hotat. diwasbhar nakatun pani.,shinka yet ahet.sardichi goli ghetli ki rahte ani pawer sampla ki puna suru hote.pliz mala upay sanga….

  3. sapna sagar salgaonkar

    mazi mulgi 3 varshachi aahe tila cough zala aahe tya var kahi gharguti upay sangu sakta ka plz…reply fast

Leave a Comment