बोईंग विमानांची अरबांनी केली धुमधडाका खरेदी

दुबई – येथे रविवारी भरलेल्या दुबई एअर शो मध्ये अरब देशातील विमान कंपन्यांनी तब्बल १४१.५ अब्ज डॉलर्स किंमतीची विमान खरेदी केली असून गल्फ कॅरिअर्सनी या खरेदीत अमेरिकन विमान उत्पादक कंपन्यांना विशेष पसंती दिली असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे २०२० सालात प्रत्यक्ष वापरात येणार्याि बोईंग ७७७ एक्स या कमी इंधन वापरणार्‍या विमानाला जादा पसंती दिली गेली आहे.

एतिहाड कंपनीने या प्रकारची २५ विमाने, ७७७ -२०० हे मालवाहतूक विमान व ३० ड्रीमलायनर विमानांची मागणी नोंदविली असून त्यासाठी १८.२ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. एतिहाड हे ७८७ ड्रीमलायनरचे सर्वात मोठे खरेदीदार ठरले आहेत. अबुधाबी विमान कंपनीने २६ बोईंगसाठी मागणी नोंदविली आहे तर एमिरेटस एअरने ९९ अब्ज डॉलर्स किमतीची विमान खरेदी केली आहे. त्यात८० टक्के वाटा बोईंगचा आहे. दुबई स्थित या कंपनीने ७७७ एक्स बोईंगची १५० विमाने, ७७७ -८-एकस जातीची ३५ तर७७७-९एक्स जातीची ११५ विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. ही खरेदी ५५. ६ अब्ज डॉलर्सची असून एअरबस ए-३८० सुपरजंबोची ५० विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. एअरबस डबलडेकर विमानांची एवढ्या मोठ्या संख्येने खरेदी होण्याची ही पहिलची वेळ आहे.