नवी दिल्ली – गेल्या दोन-तीन महिन्यात भारतात १४२ नवे राजकीय पक्ष नोंदले गेले असून देशातल्या राजकीय पक्षांची संख्या १५३४ झाली आहे. २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय पक्षांनी नव्यानेच जन्म घेतला आहे. ऑगस्ट २०१३ अखेर भारतात १३९२ राजकीय पक्ष होते. मात्र १५ नोव्हेंबरपर्यंत जवळपास दररोज दोन राजकीय पक्ष स्थापन झाले आहेत. काही बिल्डर्स, संत-साधू, दलाल आणि निवृत्त सरकारी कर्मचार्यांचा नवे पक्ष स्थापन करणार्यांमध्ये समावेश आहे.
भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. परंतु सर्वाधिक राजकीय पक्ष आहेत म्हणूनही ती सर्वात मोठी लोकशाही ठरली आहे. निवडणूक आयोगातील अधिकार्यांनी या सर्वांची नोंद करून घेतली आहे. परंतु या पक्षाच्या स्थापनेमागे काही संस्थापकांचा हेतू निव्वळ धंदेवाईकपणाचा आहे. केवळ ११ सदस्य आले की, एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करता येतो. पक्षाच्या स्थापनेसाठी कसल्याही अटी नाहीत.
पक्षाची स्थापना करणार्याला चारित्र्याचे प्रमाणपत्र सुद्धा द्यावे लागत नाही. बाबा आसाराम यांचे सध्या ङ्गरार असलेले आरोपी चिरंजीव साईराम यांनी सुद्धा ओजस्वी पार्टी या नावाने राजकीय पक्ष स्थापन केला आहे. दिल्लीमध्ये एका निवृत्त सरकारी अधिकार्याने बहुजन समाज पार्टी (बाबासाहेब) या नावाचा नवा पक्ष स्थापन केला आहे तर मुंबईतल्या एका बिल्डरने लोक पार्टी ऑङ्ग इंडिया नावाचा पक्ष काढला आहे.