देशाची प्रगती मूर्ख राजकारण्यांमुळे खुंटली – डॉ.सीएनआर राव

बंगलोर – देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ’भारतरत्न’ जाहीर झालेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी. एन. आर. राव आज चांगलेच भडकले. ’मूर्ख राजकारण्यांमुळे देशाची प्रगती खुंटली आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते बंगलोरमधल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

वैज्ञानिक प्रगतीसाठी सरकारकडून मिळालेला निधी हा अपुरा आहे. पण मिळालेल्या तुटपुंज्या निधीतही भारतीय शास्त्रज्ञ उत्तम काम करत आहेत, असा दावाही त्यांनी केला. इतकंच नव्हे तर चीनी लोकांकडून शिकण्यासारखं खूप आहे. आपण भारतीय कठोर प्रयत्न करत नाही. आपल्याला सगळं सोपं हवा असत आणि आपल्याला त्यांच्यासारखा राष्ट्राभिमानही नाही.

आपल्याला थोडे जास्त पैसे मिळाले की लगेचच परदेशात जायला तयार असतो. नवं काही आत्मसात करण्याची आपली इच्छाच नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. घनस्थिती रसायनशास्त्र आणि संरचनात्मक रसायनशास्त्रातील अतुलनीय कामगिरीसाठी डॉ. सीएनआर राव यांना कालच ’भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.