राहुल गांधींनी मुस्लिमांची माफी मागावी : जयराम रमेश

नवी दिल्ली – मुझफ्ङ्गरनगरमधील मुस्लीम युवक पाकिस्तानातल्या आयएसआयशी संधान साधून आहेत, या राहुल गांधी यांच्या जावईशोधाचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील याची जाणीव कॉंग्रेस पक्षातच वाढायला लागली आहे आणि त्यावर काही तरी उपाय योजिला पाहिजे, असा विचार काही कॉंग्रेस नेते करायला लागले आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी या संबंधात एक निवेदन केले आहे.

नवी दिल्लीमध्ये उर्दू वृत्तपत्रांच्या पत्रकारांशी एक परिषद इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये झाली. या परिषदेनंतर उर्दू पत्रकारांना जयराम रमेश यांना राहुल गांधी यांच्या या उद्गाराविषयी विचारले असता, रमेश यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु राहुल गांधींनी मुुस्लिमांची माङ्गी मागितली पाहिजे असेही प्रतिपादन केले.

राहुल गांधी यांचा हे उद्गार काढण्यामागचा हेतू वेगळा होता. त्यांना मुस्लीम समाजाला दोष द्यायचा नव्हता किंवा या समाजाची प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. परंतु राहुल गांधी यांचे हे उद्गार मर्यादेपेक्षा अधिक व्यापकपणे प्रसिद्धीस दिले गेले आणि कॉंग्रेसच्या विरोधकांनी त्याला चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर मांडले. त्यामुळे गैरसमज निर्माण झाला, असे जयराम रमेश म्हणाले.