बहुगुणी टोमॅटो

लाल टोमॅटोचे आपल्या आरोग्यावर होणारे चांगले परिणाम सर्वमान्य आहेत. त्यावर बरेच संशोधनही झालेले आहे, परंतु टोमॅटोचे इतर अनेक उपयोग आता लक्षात यायला लागले आहेत. टोमॅटोला फळभाजी म्हटले जाते. पण त्याला नेमके आहाराच्या शास्त्रात काय म्हणावे याबद्दल वाद आहेत. ते आंबट असल्यामुळे लिंबूवर्गीय फळ म्हणून त्याचा विचार केला जावा असे काही तज्ज्ञांचे मत आहे आणि ते आंबट असल्यामुळे क जीवनसत्वाचा भरपूर पुरवठा करून रोग प्रतिकार शक्ती वाढवते. आरोग्यासाठी उपयुक्त असणारे मॅग्नेशियम, फओरफस, कॉपर आणि अन्यही काही जीवनसत्वे टोमॅटोमधून मिळत असतात. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते अनेक प्रकारे खाता येते.

फळासारखे कच्चेही खाल्ले जाते, कोशिंबिरीतही वापरली जाते, त्याचबरोबर त्याची भाजीही करता येते. अनेक प्रकारे वापरले जात असल्यामुळे शरीराला आवश्यक तेवढ्या प्रमाणात ते खाल्ले जाते हे त्याचे वैशिष्ट्य आहे. टोमॅटो खाल्ल्याने चरबीची वाढ रोखली जाते, हृदयविकाराच्या झटक्याला प्रतिबंध होतो. टोमॅटोमध्ये लायकोपेन हे ऍन्टीऑग्झिटंट असल्यामुळे ते शरीराची झीज रोखते आणि तारुण्याचे रक्षण करते. म्हणून नियमाने टोमॅटो खाणार्‍यांची त्वचा आणि केस तजेलदार असतात. टोमॅटोतील के व्हिटॅमीन आणि कॅल्शियम यांच्यामुळे हाडे मजबूत होतात.

अनेक लोकांना कॅल्शियम आणि ड जीवनसत्व यांच्या अभावामुळे हाडाचे विकार होत असतात. भारतात ते शाकाहारी लोकात अगदी सामान्य आहेत. या ड जीवनसत्वाचा पुरवठा मांसाहारातून होत असतो. परंतु शाकाहारी लोकांना ते शक्य होत नाही. अशा लोकांना ड जीवनसत्व आणि कॅल्शियमचा भरपूर पुरवठा करण्याचे काम टोमॅटो करू शकते. लायकोपेनच्या समावेशामुळे टोमॅटो अनेक प्रकारच्या कर्करोगांंशी सामना करण्यास उपयुक्त ठरते. विशेषत: महिलांमधील गर्भाशयाचा कर्करोग टोमॅटोमुळे रोखला जाऊ शकतो.

मधुमेहाच्या रुग्णामध्ये ब्लड शुगरचे प्रमाण आणि समतोल राखण्यासाठी टोमॅटो खाणे उपयुक्त ठरू शकते. टोमॅटोतल्या कॅल्शियममुळे दृष्टी चांगली होते. अशा प्रकारे आरोग्याला अनेक पद्धतींनी फायदेशीर असणारे टोमॅटो हे एक सहज उपलब्ध होणारे आणि स्वस्तात मिळणारे फळभाजी कम् फळ आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment