सीआयए जमवतेय अमिरेकींची ‘आर्थिक’ माहिती

न्यूयॉर्क – व्हिसलब्लोअर एडवर्ड स्नोडेनही पोलखोल केल्यानंतरही अमेरिकेची गुप्तचर संस्था सेंट्रल इंटिलिजन्स एजन्सी (सीआयए) गुप्तपणे अमेरिकेत येणार्‍या व अमेरिकेबाहेर जाणार्‍या पैशांच्या देवाणघेवाणीची प्रचंड माहिती जमा करत आहे. त्यामध्ये लक्षावधी अमेरिकींच्या अर्थिक आणि वैयक्तिक माहितीचाही समावेश आहे.

अमेरिकेच्या नॅशनल सेक्युरिटी एजन्सीने लाखो अमेरिकी व्यक्तींच्या रेकार्डसची माहिती गोळा केल्यावर प्रचंड गहजब झाला होता. सीआयए या एजन्सीप्रमाणे सारख्याच कायद्याखाली अमेरिकी व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पैशाच्या देवाणघेवाणीची प्रचंड माहिती जमा करत आहे, असे वृत्त ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे.

वेस्टर्न युनियनसारख्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहितीही जमा करण्यात येत आहे. मात्र, या माहितीतून बँक ते बँकसाख्या देशांतर्गत व्यवहारांना वगळण्यात आले आहे, असा अनेक अधिकार्‍यांचा दावा आहे. सीआयएकडून विविध मार्गाने ही मोठया प्रमाणावरील माहिती गोळा करण्यात येत आहे, असेही न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. तथापि, सीआयएचे प्रवक्त्याने अशा प्रकारचे वृत्त फेटाळले आहे.

Leave a Comment