सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रणी मायक्रोसॉफटने त्यांचे नवीन सायबर क्राईम सेंटर अमेरिकेतील रेड मॉट येंथे सुरू केले असून या केंद्रातून जागतिक स्तरावर सायबर क्राईमसाठी सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी मायक्रोसॉफटने कायदा तज्ञ तसेच तंत्रज्ञान तज्ञांची खास नेमणूकही केली असल्याचे समजते.
या केंद्रावर १०० अॅटर्नी, तपासाधिकारी, फोरेन्सिक अॅनालिस्ट अशा विविध क्षेत्रातील तज्ञ नेमले गेले असून मालवेअर, बुद्धीसंपदा हक्क तसेच अल्पवयीन मुलांची होत असलेली पिळवणूक सारख्या अनेक सायबर क्राईमवर सोल्यूशन दिली जाणार आहेत. मायक्रोसॉफटचे हे तज्ञ जगभर विखुरले गेले असून जगभरातील सर्वच नागरिकांना ऑनलाइन सुरक्षा मिळाली पाहिजे यासाठी खास प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रकल्प प्रमुख डेव्हिड फिन यांनी सांगितले.
या केंद्रावर इंटरनेटचा वापर अधिक सुरक्षित बनविण्यासाठी खास उपाययोजना केल्या जात असून त्यात थर्ड पार्टी पार्टनर तसेच जगभरातील सायबर सुरक्षा तज्ञ कंपनीच्या या केंद्रामध्ये मायक्रोसॉफट तज्ञांसह काम करू शकणार आहेत.त्यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे.