भक्कम हृदयासाठी ग्रीन टी

हृदय रोग हा मनोकायिक विकार आहे. म्हणजे तो आपल्या नव्या जीवनशैलीतून निर्माण झाला आहे. सततची दगदग, तणाव आणि काळजी यामुळे हृदयरोग बळावतो. त्याला कसा प्रतिबंध करावा, हा एक गंभीर प्रश्‍न सर्वांसमोर उभा आहे. परंतु जपानी शास्त्रज्ञांनी प्रदीर्घ संशोधनाअंती असा निष्कर्ष कढला आहे की, सकाळी उठल्यानंतर नेहमीचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी पिल्यास हृदय विकारापासून सुटका होऊ शकते.

आपल्या दैनंदिनीमधील एवढा एक छोटासा बदल आपल्या जीवनातल्या एवढ्या मोठ्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यास बराच उपयुक्त ठरू शकतो. जपानमध्ये या संबंधात करण्यात आलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष अमेरिकेतल्या एका वृत्तपत्रात छापण्यात आले आहेत. ग्रीन टी बरोबरच अधूनमधून कॉङ्गी घेतल्यास आपण हृदयविकाराला एक हात दूर ठेवू शकतो, असा या प्रयोगाचा निष्कर्ष आहे.

योशिहिरो कोकुबो यांच्या नेतृत्वाखाली जपानच्या राष्ट्रीय हृदय रोग केंद्रात करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये ग्रीन टीचा हा नवा उपयोग अनुभवानिशी सिद्ध झाला आहे. लोक ग्रीन टी आणि कॉङ्गी जितके जास्त प्राशन करतील तेवढे हृदयरोगाचे प्रमाण कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. योगायोगाने ही पेये स्वस्तही आहेत आणि पाण्याखालोखाल लोकप्रिय सुद्धा आहे. जगाच्या कोणत्याही भागात ती उपलब्ध होऊ शकतात आणि अशा सहजप्राप्य पेयांचा उपयोग मात्र मोठा आहे. कोकुबो यांच्या प्रयोगात असे सिद्ध झाले असले तरी चहा आणि कॉङ्गीचा हा परिणाम नेमका कसा होतो आणि ती प्रक्रिया कशी घडते हे मात्र समजलेले नाही.

डॉ. कोकुबो यांच्या मते या दोन्ही पेयातील कॅटेजिन्स या द्रव्याचा हा परिणाम आहे. कॅटेजिन्स कर्करोग प्रतिबंधक सुद्धा असतात. कॉङ्गीमधील क्लोरोजेनिक ऍसिड हे द्रव्यही मोठे गुणकारी असते. ते टाईप टू या कर्करोगास प्रतिबंध करते. असे असले तरी कॅटेजिन्स आणि क्लोरोजेनिक ऍसिड यांची शरीरामध्ये होणारी प्रक्रिया नेमकी कशी असते यावर अधिक संशोधन झाले पाहिजे आणि त्याचबरोबर या दोन द्रव्यांचे काही दुष्परिणाम असतील तर त्यावरही संशोधन झाले पाहिजे. या दोन द्रव्यांचे हे परिणाम असतील तर केवळ तिच दोन द्रव्ये वेगळी उपलब्ध करून देता येतील का आणि त्यातून हृदयरोग प्रतिबंधक औषध तयार करता येईल का, यावरही संशोधन व्हावे असे कोकुबो यांनी म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “भक्कम हृदयासाठी ग्रीन टी”

Leave a Comment