इंडियन मोटरसायकल आता भारतीय बाजारात

पहिल्या व दुसर्‍या जागतिक युद्धात मोठ्या प्रमाणावर वापरली गेलेली व तेव्हाही अतिशय लोकप्रिय असलेली इंडियन मोटरसायकल आता भारतीय बाजारातही दाखल होत आहे. या मोटरसायकलचे नांव इंडियन असे असले तरी ती बनली आहे अमेरिकेत.

अतिशय आकर्षक व दमदार इंजिन असलेली ही गाडी जगभरात आजही लोकप्रिय मोटरसायकल आहे. १९०१ साली  स्थापन झालेल्या कंपनीने ही गाडी बनविली आणि १९५३ पर्यंत याच कंपनीत तिचे उत्पादन केले जात होते. अगदी सुरवातीच्या काळात तिचे नांव हेनडी असे होते मात्र १९२८ पासून ती इंडियन या नावाने परिचित आहे.१९१० सालात ही कंपनी दुचाकी क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आली होती आणि दुसर्‍यां महायुद्धात या कंपनीच्या मोटरसायकलचा वापर आर्मीने प्रचंड प्रमाणावर केला होता.

भारतातही ही गाडी लवकरच येत असल्याचे या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आले असून पोलारिस इंडस्ट्रीजने आता ही कंपनी खरेदी केली आहे. अनेक जुन्या नव्या हॉलीवूडपटातूनही या गाडीचे वारंवार दर्शन झाले आहे.

Leave a Comment