तीन कप चहा प्या, हदयविकार टाळा

लॉस ऐंजिल्स – दिवसाला केवळ तीन कप चहा पिण्यामुळे हदयविकराचा झटका येण्याची शक्यता सुमारे 20 टक्कयांनी कमी होत असल्याचे एका नवीन संशोधनात उघड झाले आहे. चहाचा पेय म्हणून वापर आणि हदयविकार यांच्यामधील परस्परसंबंध तपासण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.

दिवसाला केवळ तीन कप चहा पिण्यामुळे हदयविकराचा झटका येण्याची शक्यता 20 टक्यांनी कमी होते, असे वृत्त डेली एक्सप्रेसने दिले आहे. कॅलिफोर्निया, लॉस ऐंजिल्स विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले. आमच्या संशोधनातून दैनदिंन चहाच्या वापरामुळे हदयविकाराचा धोका कमी होण्याचा पुरावा मिळाल्याचा या संशोधकांचा दावा आहे.