सेंद्रीय शेतीत २९ पट वाढ

नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षात सेंद्रीय शेतीखाली आलेल्या जमिनीचे क्षेत्र २९ पटींनी वाढले असल्याचे कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटले आहे. जगभरामध्ये सध्या ३ कोटी ५० लाख हेक्टर जमीन या प्रकारच्या शेतीखाली आली असून सेंद्रीय शेती करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या १४ लाखांवर गेलेली आहे, असे तारिक अन्वर म्हणाले.

भारतातील ११ राज्यांनी सेंद्रीय शेतीच्या संबंधात निश्‍चित धोरण राबवले आहे आणि चार राज्यांनी दरसाल १० टक्के जमीन सेंद्रीय शेतीखाली आणण्याचा निर्धार केला आहे. गेल्या वर्षी भारतातून ३०० सेंद्रीय शेती उत्पादने परदेशी निर्यात करण्यात आली. त्यापासून देशाला ८३९ कोटी रुपये एवढे परकीय चलन मिळाले.

दिल्लीमध्ये सुरू झालेल्या ऑरगॅनिक ट्रेड ङ्गेअर या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या शेतीचा विकास अधिकाधिक करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

Leave a Comment