डॉ. विवेक मूर्ती अमेरिकेचे सर्जन जनरल

वॉशिग्टन -अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय अमेरिकन डॉ. विवेक हलेगिरी मूर्ती यांची अमेरिकेचे पुढचे सर्जन जनरल म्हणून शिफारस केली आहे. यामुळे भारतीय अमेरिकन डॉक्टर संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. डॉ.विवेक मूर्ती यांना या पदामुळे वरीष्ठ प्रशासकीय पदावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली असून ते सध्या ब्रिघम येथील डॉक्टर्स फॉर अमेरिकाचे सहसंस्थापक अध्यक्ष म्हणून तसेच वुमन्स हॉस्पिटल हॉवर्ड मेडिकल स्कूल मध्ये फिजिशिअन व इन्सट्रक्टर म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या नावाची शिफारस व घोषणा करताना ओबामा यांनी मूर्ती अमेरिकन नागरिकांची सेवा नव्या भूमिकेतही उत्तम प्रकारे बजावतील अशी खात्री व्यक्त केली आहे. २०११ मध्ये मूर्ती मेंबर ऑफ अॅडव्हान्स ग्रुप ऑफ प्रिव्हेन्शन, हेल्थ प्रमोशन व पब्लिक हेल्थ मध्ये कार्यरत आहेत. तसेच एपर्निकस, व्हिजन वर्ल्ड वाईड या संस्थांचेही ते सहसंस्थापक असून भारतात त्यांनी १९९५ मध्ये एचआयंव्ही, एडस शिक्षण देणारी स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. १९९५ ते २००० पर्यंत त्यांनी या संस्थेचे काम केले आहे. त्यानी हॉवर्ड विद्यपीठातून पदवी घेतली आहे तर एमबीए व एम.डी या पदव्या त्यांनी येल विद्यापीठातून घेतल्या आहेत.