
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील घाटकुर्ला घाटाजवळ बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 11 वर गेली आहे. बुधवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या नावेत सुमारे 25 प्रवासी असल्याने अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेतील तीन मृतदेह कालच हाती लागलेत. त्यानंतर आज 8 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. या नावेत जवळपास 25 जण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आणखी किती जण या दुर्घटनेमध्ये दगावले हे अद्याप समजू शकलेले नाही.
