मोदींना महिला सुरक्षा रक्षकांचे कवच दिल्याने वाद

अहमदाबाद – गुजराथचे मुख्यंमत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोवती सध्या दिवस असलेल्या साध्या वेशातील महिला पोलिसांच्या कड्यावरून भाजप आणि काँग्रेस पक्षात वाद सुरू झाला आहे.

मोदी गेली अनेक वर्षे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यातही मोदींना महिला दहशतवाद्यांकडूनच अधिक धोका असल्याची खबर गुजराथ पोलिसांना मिळाली आहे. मोदींच्या सभेला महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित असतो. त्यामुळे जेव्हा मोदींचे कार्यक्रम मैदानात होत असतील तेथे तरी त्यांना महिला पोलिस कर्मचार्‍यांकडून सुरक्षा दिली जात असून या महिला पोलिस सलवार खमीस अथवा शर्ट पँट अशा पोषाखात असतात. मोदींना राष्ट्रीय सुरक्षा गार्ड व गुजराथ पोलिस मिळून ४५ कमांडोंचे संरक्षण आहेच.

मात्र मोकळ्या मैदानात मोदी स्टेजवरून बोलणार नसतील व प्रेक्षकात सामील होणार असतील तेथे महिला पोलिसांना त्याच्याभोवती कडे करण्याच्या सूचना गुजराथ गृहमंत्रालयाकडून दिल्या गेल्या आहेत. जनतेशी संवाद साधताना व त्यातही गुजराथमध्ये तरी ही सुरक्षा त्यांना दिली जाणार असल्याचे गुजराथचे अतिरिक्त मुख्य सचिव एस.के.नंदा यांनी सांगितले. हे संरक्षण गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment