गुन्हेगारीत अग्रणी

महाराष्ट्रातल्या सरकारने गेल्या १५ वर्षात काय केले असा प्रश्‍न विचारला तर एक उत्तर हमखास येते की, या सरकारने महाराष्ट्राचा बिहार केला. बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेेश आणि राजस्थान या चार राज्यांना बिमारू स्टेटस् असे म्हणतात. या चार राज्यांच्या नावांच्या आद्याक्षरावरून ही नाव तयार झाले आहे पण आता आता लोक असे म्हणत आहेत की या चार राज्यातल्या मध्य प्रदेशाच्या जागी महाराष्ट्राचे नाव घातले पाहिजे कारण महाराष्ट्राने गुन्हेगारीत सर्वांना मागे टाकले आहे. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात गुुन्हेगारीच्या सर्वच अंगांनी वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे कोणत्याही राज्याला त्याचा बिहार झाला असे म्हणण्यापेक्षा त्याचा महाराष्ट्र झाला असे म्हणणे अधिक योग्य ठरेल असे वाटायला लागले आहे. काह्ी दिवसांपासून केन्द्रीय आकडेवारी मंडळाने देशातल्या गुन्हेगारीची आकडेवारी जाहीर करायला सुरूवात केली आणि गुन्हेगारीच्या प्रत्येक खात्यात महाराष्ट्राचा नंबर अव्वल असल्याचे दिसून येत आहे. देेशातले सर्वाधिक चोर्‍या होणारे राज्य कोणते ? सर्वात अधिक चोर्‍या होणारे शहर कोणते आणि या आघाडीवरच्या राज्यांनी आणि शहरांनी गेल्या तीन वर्षात किती रकमेचा ऐवज गमावला आहे याचीही माहिती जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातले आपले सरकार सारे काही आलबेल आहे असे सांगून आपले समाधान करते तेव्हा आपण मिळालेल्या अर्धवट माहितीवरून समाधानी होतो पण प्रत्यक्षात आकडेवारी मिळते तेव्हा आपण किती असुरक्षित आहोत आणि राज्यात सारे काही आलबेल नाही हे लक्षात येते. तेव्हा आपण आता या आकडेवारीकडे वळू या. गेल्या तीन वर्षात म्हणजे २०१० ते २०१२ या काळात महाराष्ट्रात चोर्‍या, दरोडे, घरङ्गोड्या, ङ्गसवणूक, वाटमारी, करारभंग या मार्गांनी १८ हजार ६८२ कोटी रुपयांची लूट झाली. या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. दुसरा कशात नसेना का पण या बाबतीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. या चोर्‍यांत लुटला गेलेल्या मालातला निम्मा माल एकट्या मुंबई शहरातला होता. म्हणजे या गुन्ह्यात या तीन वर्षात मुंबईकरांचा नऊ हजार ८१८ कोटी रुपयांचा माल गेला आहे. या बाबतीत मुुंबई शहर हेही शहरांमध्ये पहिला क्रमांक आहे. चोर्‍या करणार्‍यांना पाटबंधारे खात्यातल्या अभियंत्याच्या घरावर दरोडा घातला तर हातात बरेच काही लागेल याचा त्यांना अंदाज असतो. त्यांचा माल चोरीचा असल्याने ते हळुहळू बांेंबलत असतात. चोरी झाली तरी ते ङ्गार बोंबलत नाहीत आणि चोरीला गेलेल्या मालाची खरी माहिती देऊ शकत नाहीत.

कारण खराच किती माल गेलाय हे सांगितले तर एवढा माल आणला कोठून हा प्रश्‍न विचारला जाण्याची शक्यता असते. तेव्हा २० तोळे सोने चोरीला गेले असेल तर त्यांना १० तोळे गेले म्हणून सांगावे लागते. एकंदरीत चोरीतले आकडे बनावट असतात. तसे ते असूनही एकूण लंपास झालेला माल १८ हजार कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे पोलिसांत एवढ्या रकमेची नोंद आहे. खरेच किती रुपयांचा माल गेला आहे हे माहीत नाही. एकंदरीत या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. २००७. ०८ आणि २००९ या तीन वर्षांची आकडेवारी याच खात्याने दिली होती. तिच्याशी या नव्या आकड्यांची तुलना केली असता असे लक्षात आले आहे की, त्या पूर्वीच्या तीन वर्षांपेक्षा पुढच्या तीन वर्षात चोरीस गेलेला माल आठ पट जास्त आहे. ही आकडेवारी तर धक्कादायक आहेच पण चोर्‍या उघड होण्याचे प्रमाणही धक्कादायक आहे. २०११ साली चोरीस गेलेल्या मालापैकी १२.१ टक्के माल हस्तगत करण्यात यश आले. पण २०१२ साली हे प्रमाण केवळ १.६ टक्के होते. याचा अर्थ शंभर चोर्‍या झाल्यास त्यातली केवळ एक ते दीड चोरी पोलिसांना सापडली आहे. म्हणजे १८ हजार कोटी रुपयांची चोरी झाली पण त्यातल्या जेमतेम दोन हजार कोटीच्या मालाची चोरी उघडकीस आली. हे प्रमाण भारतात सर्वात कमी आहे. म्हणजे याही बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक पहिलाच आहे.
आपण आपल्या आसपास नजर टाकली तर असे लक्षात येते की, महाराष्ट्राच्या काही शहरांमध्ये दररोज घरङ्गोड्यांचे सत्र जारी आहे. नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, ठाणे या शहरातल्या स्थानिक वृत्तपत्रांवर नजर टाकली तर ही वस्तुस्थिती समोर येते. यातल्या काही शहरात तर एका दिवसात दोन-दोन तीन-तीन घरङ्गोड्या होतात. वृत्तपत्रात बातम्या येतात, पोलीस शांत बसतात. या चोर्‍या करणार्‍या चोरांना पकडणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहे. त्यामुळे शंभर चोर्‍या झाल्या तर त्यातली एखादीच चोरी उघड होते. पोलिसांच्या या अकार्यक्षमतेमुळे घराला कुलूप लावून घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. लोक विलक्षण घबराटीत जगत आहेत. आपण घराला कुलूप लावून बाहेर पडलो तर परत येईपर्यंत घर सुरक्षित राहिलेले असेलच याची खात्री नाही, असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यवस्था, महिलांविरोधी गुन्हे, दलितांवरील अत्याचार आणि महिलांचे गुन्हे अशा सर्वच बाबतीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रामध्ये घरङ्गोड्या आणि चोर्‍यांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्र हे शांत, स्थिर राज्य आहे असे प्रदीर्घकाळपासून म्हटले जात आहे. परंतु हे म्हणणे किती भ्रामक आणि चुकीचे आहे हे लक्षात येत आहे.

Leave a Comment