इंटरनेट युझर्समध्ये भारत लवकरच दुस-या स्थानी

नवी दिल्ली- इंटरनेट युझर्सच्या संख्यबाबत लवकर भारत अमेरिकेला मागे टाकण्याची शक्यता आहे. येत्या आठ महिन्यात भारतातील इंटरनेट युझर्सची संख्या 18.53 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून जून 2014पर्यंत देशातील इंटरनेट युझर्सची संख्या 24 कोटी 30 लाख इतकी होणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. इंटरनेट युझर्सच्या संख्यबाबत सध्या 30 कोटी युझर्ससह चीन आघाडीवर आहे. तर 20 कोटी 70 लाख युझर्ससह अमेरिका दुस-या स्थानावर आहे.

इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाईल असोशिएशन ऑफ इंडिया आणि आयएमआरबी इंटरनॅशनल यांच्या नव्या अहवालानुसार जून 2014पर्यंत देशातील इंटरनेट युझर्सची संख्या 24 कोटी 30 लाख इतकी होण्याची शक्यता आहे. भारतातील इंटरनेट युझर्सची संख्येने हे लक्ष्य गाठल्यास जागतिक इंटरनेट युझर्सच्या संख्यबाबात भारत दुस-या स्थानावर पोहचेल असे या अहवालात म्हटले आहे. ऑक्टोबर 2013मध्ये देशातील इंटरनेट युझर्सची संख्या 20 कोटी 50 लाखांवर पोहचली आहे. एका वर्षात नेट युझर्सच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली असून डिसेंबर 2013पर्यंत ही संख्या 21 कोटी 30 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

येत्या काही वर्षांत मोबाईलवरून इंटरनेट वापरणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मोबाईल इंटरनेट हा भविष्यातील महत्त्वाचा भाग ठरणार आहे. देशातील इंटरनेट युझर्सची संख्या एक कोटीहून दहा कोटींवर जाण्यास दहा वर्षांचा कालावधी लागला. मात्र 10 कोटींहून 20 कोटींहा टप्पा केवळ तीन वर्षात गाठला आहे. येत्या काळात इंटरनेटवर आधारीत अर्थव्यवस्थेला चालणा मिळणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. संख्या देशातील 11 कोटी युझर्स मोबाईलवरुन इंटरनेटचा वापर करतात. डिसेंबरमध्ये हेच प्रमाण 13 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. इंटरनेटच्या वापरमध्ये सर्वाधिक वेळ सोशल नेटवर्किंग वेबसाइटसाठी दिला जातो. त्यानंतर मनोरंजन, ई-मेल आणि अन्य कारणांसाठी केला जातो असेही या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment