अँग्री बर्ड निर्माती रोव्हीओ सध्या तरी पब्लीक इश्यू पासून दूरच

अँग्री बर्ड या मोबाईल व्हिडीओ गेमने जगभरात अफाट लोकप्रियता मिळविली आहे. या गेमची निर्मिती करणार्‍या फिनलंडच्या रोव्हिओ कंपनीने इतक्यातच पब्लीक इश्यू जाहीर केला जाणार नसल्याचा खलासा केला आहे. यापूर्वी कंपनीने  २०१३ मध्ये कंपनी पब्लीक इश्यू काढणार असल्याची घोषणा केली होती.

कंपनीचे वरीष्ठ अधिकारी मार्केटिंग प्रमुख पीटर वेस्टरबॅक या संदर्भात बोलताना म्हणाले की आम्ही सध्या सारे लक्ष कंपनीचा विकासाकडे केंद्रीत केले आहे. सध्या तरी पब्लीक इश्यूमधून पैसा उभारण्याची गरज आम्हाला वाटत नाही. जगातील सर्व बाजारपेठ काबीज करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. अँग्री बर्ड ब्रँडचा कंपनीने विस्तार केला असून अनिमेटेड टिव्ही सिरीज व खेळणी, कपडे अशी उत्पादने बाजारात आली आहेत.

कंपनी फिनलंडच्या अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन सिस्टीमचे प्रमोशन चीन मध्ये करण्याच्या कामातही गुंतली असल्याचे सांगून पीटर म्हणाले की गतवर्षात कंपनीने १५२ दशलक्ष युरोचा व्यवसाय केला आहे. कंपनीच्या नफ्यात ८४ टक्के वाढ झाली आहे. ९४ टक्के चीनी लोकांना रंगीत अँग्री बर्ड गेमची माहिती आहे तर अमेरिकेत हेच प्रमाण ९० टक्के आहे. म्हणजे आम्हाला अजूनही वाढीला जागा आहे. डिसेंबरमध्ये कंपनी नवीन अँग्री बर्ड गेम बाजारात आणणार आहे.

Leave a Comment