केसावरून रोगनिदान

आजारी व्यक्तीचे रोगनिदान नेमकेपणाने करायचे असेल तर रक्त, लघवी, थुंकी यांचे परीक्षण करतात. या चाचण्या आता आवश्यक झाल्या आहेत आणि त्या परिणामकारकही असतात. परंतु आता शास्त्रज्ञांनी व्यक्तीच्या केसांवरून त्याच्या विविध विकारांचा अंदाज बांधायला सुरुवात केली. माणसाच्या डोक्यावरच्या केसाचा रंग आणि त्याचा कोरडेपणा यावरून काही रोगांचे निदान करता येईल, असा डॉक्टरांचा दावा आहे. माणसाच्या मनातील तणाव, काळज्या यांचा परिणाम केसावर होत असतो. काळजी करणार्‍या माणसाचे केस लवकर पांढरे होतात. केस पांढरे होण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत, परंतु मानसिक तणाव हे एक मुख्य कारण मानले जाते. असे जर आहे तर अधिक पांढरे केस असणार्‍या माणसाला अधिक काळज्या असतात असे अनुमान काढण्यात काही चूक नाही.

केसांचे पांढरे होणे हे सकृतदर्शनी आपल्याला रंगबदल एवढेच माहीत असते. परंतु केसांच्या पांढरे होण्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकाराचे सूक्ष्म अवलोकन करून ते पांढरे होणे कशापोटी निर्माण झाले आहे हे कळू शकते आणि आता तर व्यक्तीच्या तणावाची पातळी किती आहे, हेही केसांवरून ओळखले जायला लागले आहे. एवढे कळत असेल तर एखादी व्यक्ती काळजीतून निर्माण होणार्‍या हृदयरोगापासून किती जवळ आहे हेही ओळखू येऊ शकते. माणसाच्या शरीरातील हार्मोन्सचा असमतोल हाही केसांवरून ओळखता येऊ शकतो. त्यामुळे या असमतोलातून निर्माण होऊ पाहणार्‍या विकारांचे निदान सुद्धा केसांवरून होऊ शकते.

केसातील कॉर्टिसॉल या घटकाचे प्रमाण या दृष्टीने ङ्गार महत्वाचे असते. म्हणून केस तपासताना त्यातील कॉर्टिसॉलचे प्रमाण मोडले जाते. नेदरलँडस्मधील लॉरा मॅनेन्चिन या डॉक्टरने केसावरून रोगनिदान करण्याच्या पद्धतीचा अधिक अभ्यास केला आहे. ६५ ते ८५ या वयोगटातील २८३ लोकांच्या केसांची तपासणी करून त्यातील कॉर्टिसॉलच्या प्रमाणावरून त्यांच्या प्रकृतीचे सारे निदान करता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले. केस पांढरे होण्याचा प्रकृतीशी ङ्गार घनिष्ट संबंध आहे, हे या चाचणीतून त्यांनी दाखवून दिले. एखाद्या व्यक्तीने वय लपविण्यासाठी केस रंगवले तरीही हा रंग डॉक्टरला ङ्गसवू शकत नाही. तो धुवून काढून त्याच्या मूळ रंगावरून आरोग्याचे परीक्षण केले जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment