सलमान करतोय फिरण्यासाठी सायकलचा वापर

हिट एंड रन प्रकरनातून अभिनेता सलमान खानने चांगलाच धडा घेतलेला दिसत आहे. सलमान मुंबईत सध्या रात्रीचा फिरताना गाडीचा वापर न करता आता सायकलचा वापर करीत आहे. काही दिवसापूर्वी त्याने नरिमन पॉईंटवर त्याने चक्क सायकवरून प्रवास केला.

सलमान खानने आपल्या बॉडीगार्डच्या गराड्यात नरिमन पॉईंटवर प्रवास केला. यावेळी चाहत्यांना थोडावेळ काहीच समजले नाही. मात्र, सल्लू असल्याचे समजतातच त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली खरी. तोपर्यंत सलमान सायकलने पुढे निघून गेला होता.हिट एंड रन प्रकरनातून अभिनेता सलमान खानने चांगलाच धडा घेतलेला दिसत आहे.

हिट एंड रन प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरोधात सलमानने सेशन कोर्टात अपील केलं होतं. आपल्याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतून आपल्याला मुक्त करण्यात यावं, असं अपील सलमान खानने केलं होतं. मात्र हे अपील फेटाळून लावल्यामुळे सलमान खानच्या अडचणींत वाढ झाली. या प्रकरणी सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदावण्यात आला.