मायक्रोसॉफ्ट आणणार स्वतःच्या ब्रँडचा हँडसेट

फिनिश हँडसेट मेकर नोकिया कंपनीचे अधिग्रहण करून मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर क्षेत्रातील जायंट कंपनीने हार्डवेअर आणि डिव्हायसेस व्यवसायात पदार्पण केले असतानाच कंपनी लवकरच त्यांच्या ब्रँडचा हँडसेट बाजारात आणणार असल्याचे वृत्त आहे. कंपनी स्वतःचा विंडोज फोन नक्की कधी आणणार याविषयी मात्र माहिती मिळू शकलेली नाही.

मायक्रोसॉफट इंडियाचे विंडोज फोन बिझिनेस प्रमुख विनित दुराणी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले कंपनीने सॉफटवेअर क्षेत्रापुरते मर्यादित न राहता डिव्हायसेस व सेवा क्षेत्रात उतरण्याचा निर्णय पूर्वीच घेतला होता. नोकियाचे अधिग्रहण हा या योजनेचाच भाग आहे. नोकिया बरोबरची सर्व डील क्लिअर झाल्यानंतर आमचा हँडसेट आमच्या ब्रांड नावाने बाजारात येईल. मात्र तोपर्यंत आम्ही सॅमसंग, हुवाई, एचटीसी यांच्याबरोबर विंडोज ओ एस हँडसेटचे काम सुरूच ठेवणार आहेात.

या क्षेत्रात स्पर्धा तीव्र असल्याने मायक्रोसॉप्टची कामगिरी कशी असेल हे आत्ताच सांगता येणार नाही . मात्र मायक्रोसॉफटने हँडसेट क्षेत्रातील जगातील आघाडीची आणि अनुभवी कंपनी असलेल्या नोकियाचे अधिग्रहण केलेले असल्याने ते स्पर्धेत फारसे मागे पडणार नाहीत असा जाणकारांचा अंदाज आहे.

Leave a Comment