‘बाजीगर’ सिनेमाला २० वर्ष पूर्ण

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडचा बादशाह असलेला शाहरुख खान पुन्हा जुन्या आठवणीत गुंतला आहे. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’ या सिनेमाने २० वर्षे पूर्ण केली आहेत. ४८ वर्षीय शाहरुखने या सिनेमाकरिता ट्विटरवरून दिग्दर्शक अब्बास-मस्तान आणि सहकलाकार काजोल, शिल्पा शेट्टी व राखी यांचे आभार मानले आहेत.

या बाबत बोलताना अभिनेता शाहरुख म्हणाला , ‘बाजीगर’ चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. अब्बास-मस्तान, काजोल, शिल्पा आणि राखी यांचे मी आभारी आहे. तसेच, पुढे त्याने “अभी भी हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है” हा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग लिहला आहे. या सिनेमातील भूमिकेनंतर त्याने डर आणि अनजाम या चित्रपटांमध्येही खलनायकाची भूमिका केली होती.

चेन्नई एक्स्प्रेस सिनेमाच्या यशानंतर शाहरुख हा दीपिका पादुकोणसोबत फराह खानच्या आगामी ‘हॅप्पी न्यू इयर’ सिनेमात दिसणार आहे. त्या सिनेमाची तयरी गेल्या काही दिवसापासून शाहरुख खान करीत आहे. या कामतच तो बिझी असल्याचे समजते.

Leave a Comment