आम आदमी पक्षाला निधी मिळतो कुठून?- शीला दीक्षित

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचारात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढू लागल्यामुळे सर्वच पक्षांना दडपण जाणवू लागलं आहे. आम आदमी पार्टी निधीच्या स्रोतावर दिल्लीच्या मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाच्या नेत्या शीला दीक्षित यांनी प्रश्नपचिन्ह निर्माण केले आहे.

दिल्ली राज्य प्रशासनामधील भ्रष्टाचाराचा नाश ही आम आदमी पक्षाची या निवडणुकीसंदर्भातील मुख्य घोषणा आहे. केजरीवाल यांनी दीक्षित यांच्यावर भ्रष्ट काराभाराचा आरोप केला आहे. या पार्श्वोभूमीवर दीक्षित यांनी प्रतिहल्ला चढवित केजरीवाल हे त्यांच्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप करत असून सर्वांना एकाच मापात तोलत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

आम आदमी पक्षाच्या विश्वारसार्हतेबद्दलही दीक्षित यांनी यावेळी शंका उपस्थित केली. आम आदमी पक्षाला एवढा निधी कुठून मिळतो? विदेशातून या पक्षाला मिळणार्‍या देणग्यांची चौकशी व्हायला हवी.‘‘ असे दीक्षित म्हणाल्या. यानंतर आम आदमी पक्षास समाजामधील वेगवेगळ्या थरांमधील सुमारे 63 हजार जणांकडून 19 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती समोर आली होती.

Leave a Comment