अल्पवयातील माता लठ्ठ

मातृत्वाचा मान महिलांना कधी मिळावा यावर अनेकांचे अनेक मते आहेत. मुली करीयरच्या मागे लागल्या असल्याने त्या पंचविशीनंतरच विवाह करीत आहेत. पण या वयानंतरची प्रसूती अवघड असते. अर्थात त्यामुळे ङ्गार लवकरही विवाह करणे योग्य नसते. भारतात ६० टक्के मुलींचे विवाह २० वर्षांच्या आतच होतात. त्यांना पौगंडा वस्थेतील माता असे म्हटले पाहिजे. त्याही मातृत्वात काही दोष असतात. कमी वजनाची अशक्त मुले, मातांना होणारे बाळंतरोग हे काही धोके या वयातल्या मातृत्वाचे दोष आहेत आणि हा भारतातला नेहमीचा प्रकार आहे.

आता काही तज्ज्ञांंनी या वयातल्या मातृत्वाचा एक मोठा धोका शोधून काढला आहे. २० वर्षांच्या आता माता झालेल्या मुलींचे वजन प्रसूतीनंतर एकदम वाढण्याची शक्यता असते. अमेरिकेत ही गोष्ट आढळून आली आहे. युनिव्हर्सिटी ऑङ्ग मिशिगन हेल्थ सिस्टिम या संस्थेतल्या संशोधकांनी हा नवा निष्कर्ष काढला आहे. अतीशय लठ्ठ महिलांचे एक सर्वेक्षण करताना असे दिसून आले की, अधिक लट्ठ महिला या अशाच कमी वयात माता झालेल्या होत्या. अशा माता हा आता अमेरिकेच्या सामाजिक जीवनाचा एक मोठा चिंतेचा विषय झाला आहे आणि आता आता हा विषय समोर आला आहे.

अमेरिकेतल्या महिला आणि बालकांच्या आरोग्या संबंधात सर्वेक्षण करताना अचानकपणे ही बाब समोर आली. वजन वाढल्यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना तोंड देणार्‍या महिलांना त्यांच्या आरोग्याचा इतिहास विचारण्यात आला तेेव्हा अशा महिलांत बहुतेक महिला विशी गाठण्याच्या आतच माता झाल्या होत्या असे दिसून आले. अमेरिकेत आता मुलींच्या विवाहाचे वय वाढले आहे पण विवाह आणि मातृत्व यांचा काही संबंध राहिलेला नाही. अनेक महिलांनी विवाह न होताच वयाच्या तेरा ते १९ या वयात मुलाला जन्म दिलेला होता.

कमी वयातल्या बहुतेक माता या कुमारी माताच आहेत. म्हणजे अमेरिकेतला हाही एक मोठा प्रश्‍नच झाला आहे. लठ्ठपणा अर्थात महिलांत दिसून येणारा लठ्ठपणा हा अमेरिकेतला एक मोठा प्रश्‍न आहेच पण या लठ्ठपणाच्या मागे दडलेले कुमारी मातृत्वाचे कारण केवळ वैद्यकीय नाही तर सामाजिकही आहे. तिथल्या समृद्धीने समाजाला नैतिक अधिष्ठान राहिलेले नाही. अमेरिकेतल्या लठ्ठपणाच्या समस्येचे गांभीर्य एवढे आहे की, केवळ या समस्येला वाहिलेले एक मासिक तिथे काढले जाते. ज्याला जर्नल ऑङ्ग ओबेसिटिक्स असे म्हटले जाते.