सीआरपीएफचा एक जवान शहीद

छत्तीसगढ – दक्षिण छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात काटेकल्याणहून परतत असतांना 186 बटालियनच्या जवानांवर माओवाद्यांनी हल्ला केला ज्यात एक जवान शहीद झाला. तर सकाळच्या वेळी दहा जिवंत बॉम्ब, 10 किलो पाईप बॉम्ब जवानांनी जप्त केले, त्यावेळी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. या मतदारसंघांमध्ये 2300 मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली होती.

बस्तर आणि राजनंदगावच्या 13 मतदारसंघात माओवादी हल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यामुळे तिथे कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली होती. विधानसभेच्या निवडणुकीसाठी छत्तीसगढमध्ये दोन टप्पात मतदान होणार आहे. बस्तरमधील 12 आणि राजनंदगाव इथल्या सहा अशा एकुण 18 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज 70 टक्के मतदान झाले सहाय्यक निवडणुक अधिकारी डी.डी. सिंघ यांनी ही माहिती दिली. छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा दुसरा टप्पा 19 नोव्हेंबरला असेल आणि मतमोजणी 8 डिसेंबरला होईल.

Leave a Comment