राजधानी दिल्लीला भूकंपाचे तीन तासात चार धक्के

नवी दिल्ली – रात्री साडेबारा ते पहाटे पावणेचार या वेळात राजधानी दिल्लीला भूकंपाचे चार धक्के बसले. पाठोपाठ बसत असलेल्या धक्क्यांमुळे घाबरलेले नागरिक रस्त्यावर आले व अनेकांनी सगळी रात्र रस्त्यावरच काढली असल्याचे समजते.मात्र हे चारी धक्के सौम्य स्वरूपाचे होते व मोठ्या नुकसानीची कोणतीही खबर अद्याप मिळालेली नाही.

रात्री १२ वाजून ४१ मिनिटांनी पहिला भूकंप झाला त्याची तीव्रता ३.१ रिश्टर इतकी होती. त्या पाठोपाठ दीड, १ वाजून ५५ मिनिटे व पहाटे ३ वा.४० मिनिटे असे पाठोपाठ आणखी तीन धक्के बसले. सर्व धक्के साधारणपणे तीन ते चार सेकंदच जाणवले. मात्र त्याची व्याप्ती दिल्ली, गुरगांव, नॉईडा व गाझियाबादपर्यंत होती.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या धक्क्याचा केंद्रबिंदू दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म भागात भूगर्भात १० किमी खोलवर होता तर दुसर्यात धक्क्याचा केंद्रबिंदू हरियानातील मणेसर भागात होता.

Leave a Comment