पाश्‍चात्य आहार हानीकारक

आपण जे अन्न खातो ते अनेक वर्षांच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून निश्‍चित झालेले असते. आपण तुरीची डाळ खातो कारण ड जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारे तेच एक स्वस्त खाद्य आपल्याला उपलब्ध आहे. पण ही डाळ पित्त वाढविणारी आहे. त्यामुळे डाळीच्या वरणात लिंबू पिळून खावे असा वर्षानुवर्षांचा संकेत आहे. असे आपले अन्न अनेक गोष्टींचा विचार करून ठरवलेले असते. आपण दुसर्‍या देशातल्या लोकांचे अन्न खायला लागलो की ते आपल्याला पचत नाही आणि त्यातून अनेक तक्रारी निर्माण होतात. आता अमेरिकेतल्या लोकांनी आपल्या खाद्यांचा ङ्गार बारकाईने विचार करायला सुरूवात केली आहे.

अमेरिकेतील लोक जे काही खातात ते खरोखरच त्यांच्यासाठी योग्य आहे का याचा पडताळा ते घेत आहेत. तेव्हा त्यांच्या असे लक्षात येत आहे की त्यांचे खाद्य त्यांच्या प्रकृतीला अनुकूल ठरणारे नाही. युरोप खंडातील लोकांच्या अनुकरणातून अमेरिकेतली खाद्य संस्कृती उदयाला आलेली आहे. मात्र अमेरिकेतल्या लोकांना वयपरत्वे होणारे काही विकार या विशिष्ट खाद्यपदार्थांमुळे होत असतात. आहार शास्त्रात डॉक्टरेट केलेल्या तस्मीन अकबर अली या विदुषीने हे निरीक्षण नोंदविलेले आहे. अतीशय गोड पदार्थ, भरपूर प्रकिया केलेले मांस, रिङ्गाईंन्ड म्हणजे पॉलीश करून वरचा पौष्टिक थर घालविलेले धान्य त्याचबरोबर भरपूर चरबीचे प्रमाण असणारे दुग्धजन्य पदार्थ यांचा प्रकृतीवर मोठा गंभीर परिणाम होतो असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांनी यासाठी १६ वर्षे अनेक रुग्णांची निरीक्षणे केली आहेत आणि या आहारांचा माणसाच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम होतो असा निष्कर्ष काढला आहे. अमेरिकेतील लोकांच्या आहारातील वरील सर्व पदार्थामुळे त्यांची वृध्दपणाकडे होणारी वाटचाल गतीमान होते असे त्यांचे मत आहे. अमेरिकेत आता अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ मिळायला लागले आहेत. त्यामुळे तिथले लोक इडलीवडा, उप्पीट हे भारतीय पदार्थ आवडीने खायला लागले आहेत. या पदार्थांमुळे त्यांना मांसाहाराची मजा येत नसेल परंतु त्यांचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम निश्‍चितच चांगला आहे. त्यामुळे अमेरिकन लोकांत इंडियन रेस्टॉरंटस्ची संख्यासुध्दा वाढत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment