पाटणा स्फोटात हिंदू तरुण अटकेत : पोलीस बुचकळ्यात

पाटणा – पाटणा येथे गेल्या २७ तारखेला नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना झालेल्या स्ङ्गोटामागे इंडियन मुजाहिदीन या संघटनेचा हात असून तिला या स्ङ्गोटासाठी पाकिस्तानची मदत मिळाली आहे असे सर्वसाधारणत: दिसून येत असले तरी या स्ङ्गोटाच्या प्रकरणात चार हिंदू तरुणांना अटक झाली आहे. त्यांनी स्ङ्गोट घडविणार्‍यांना आर्थिक मदत केल्याचा संशय आहे. या प्रकाराने पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. या कटात हे हिंदू तरुण कसे सहभागी झाले, असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे.

बिहारच्या पोलिसांबरोबरच एन.आय.ए. या केंद्रीय तपास यंत्रणेनेही या आरोपींचा तपास केला असून या संबंधात बिहार आणि झारखंडमधून अटक केलेल्या सात जणांनी या स्ङ्गोटांचा इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याचे निखालसपणे सांगितले आहे. परंतु हा जर मुस्लीम संघटनेचा कट असेल तर त्यात हे चार हिंदू तरुण कसे गुंतले असावेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

काही पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या चौघांनी बॉम्बस्ङ्गोट घडविणार्‍यांना पैशाची मदत केली आहे. हे चौघेही हवाला रॅकेटमध्ये गुंतलेले आरोपी आहेत आणि आपण नेमकी कोणाला मदत करत आहोत याविषयी ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. अशा कारस्थानांमध्ये एक मोठी साखळी असते. या साखळीतला प्रत्येक दुवा आपल्या आधीची कडी आणि नंतरची कडी यांनाच ङ्गक्त ओळखत असतो. साखळीतला पहिला दुवा कोण आहे आणि ही साखळी शेवटी कुठे जात आहे याविषयी हे अधलेमधले दुवे पूर्णपणे अनभिज्ञ असतात.

पैशाच्या प्रलोभनाने या तरुणांनी सांगितल्यानुसार कोठून तरी पैसे घेतले आणि कोणाला तरी दिले. मात्र हे मुळात पाकिस्तानकडून आले आहेत आणि ते शेवटी देशात बॉम्बस्ङ्गोट घडविण्यासाठी वापरले जाणार आहेत हे त्यांना माहीत नव्हते. निदान पोलीस आता तरी असे सांगत आहेत. परंतु काही लोकांच्या मते पाकिस्तानच्या मदतीने कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटना आता हिंदू तरुणांचा सुद्धा वापर करत आहेत असेही असू शकते.

Leave a Comment