गुगलचा नेक्सस ७ आजच भारतात लाँच

नवी दिल्ली – अॅपलची आयपॅड मिनी विथ रेटिना व आयपॅड एअर ही उत्पादने भारतात येऊ घातली असतानाच लगीनघाई करून प्रतिस्पर्धी कंपनी इंटरनेट जायंट गुगलने त्यांचा नेक्सस ७ हा टॅब्लेट आजच भारतात लाँच करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या टॅब्लेटची भारतातील किमत ३२ जीबी साठी २५९९९ रूपये जाहीर केली गेली आहे. हा टॅब्लेट वायफाय व फोर जी सह उपलब्ध असून या उपरकरणात प्रथमच ४.३ व्हर्जन अॅड्राईड सॉफ्टवेअर वापरले गेले आहे.

या टॅब्लेटला १७.५ सेंमीचा डिस्प्ले स्क्रीन तसेच पाच मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याची बॅटरीही जादा चालणारी आहे. वास्तविक या महिन्याच्या अखेरीला हा टॅब्लेट भारतात लाँच केला जाणार होता. या टॅब्लेटला एसडी मायक्रो सपोर्ट सिस्टिम मात्र देण्यात आलेली नाही.