अंतराळातून पृथ्वीवर परतली ऑलिंपिक मशाल

मास्को – इतिहासात प्रथमच स्पेस वॉक करण्यासाठी अंतराळात नेण्यात आलेली ऑलिंपिक मशाल रशियन सोयूझ टीएमए ०९ ए या यानातून पृथ्वीवर परत आणण्यात आली आहे. सोमवारी रशियन अंतराळयात्री फिदोर युरचिखिन, अमेरिकन अंतराळवीर नोबर्ग व इटालियन अंतराळवीर ल्यूका हे या मशालीसह रात्री साडेआठच्या सुमारास कझाकिस्तानातील स्टेशनवर उतरले.

मिशन कंट्रोलने यान उतरण्याच्या जागेवर सुरक्षेचे उपाय म्हणून २०० बचाव कर्मचारी, १२ हेलिकॉप्टर व ६ आपत्कालीन वाहने तैनात केली होती. सोची येथे ७ फेब्रुवारी पासून सुरू होत असलेल्या हिवाळी आर्लिपिक साठी वापरण्यात येणारी ही मशाल ७ नोव्हेंबरला अंतराळात पाठविली गेली होती. तेथे ती दोन वेळ फिरवण्यात आली. आता ही मशाल रशियातील १३२ शहरातून फिरविली जाणार आहे. या हिवाळी ऑलिंपिक मध्ये ९८ प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत असे समजते.

Leave a Comment