बिजिंग – फिलिपिन्समध्ये धुमाकूळ घालून १० हजार जणांचा बळी घेणारे राक्षसी वादळ हैयान आता चीनच्या किनार्यावर पोहोचले आहे. किनारपट्टीवरील लोकांचे आणि मालमत्तांचे नुकसान रोखण्यासाठी या भागात ऑरेंज अॅलर्ट दिला गेला असून हवामान विभागाच्या पद्धतीप्रमाणे हा दुसर्या क्रमांकाचा अॅलर्ट समजला जातो.
चीनच्या हैनान, ग्वांगदोंग व ग्वांगजी घुआंग या भागाला या वादळापासून मोठा धोका असून राज्य पूर नियंत्रण यंत्रणेने वादळावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच सुरक्षेचे उपाय योजण्यासाठीच्या सूचना संबंधित प्रशासनांना जारी केल्या आहेत. हैयान हे चीनमध्ये आलेले आत्तापर्यंतचे ३० वे सर्वात मोठे वादळ असून काल सायंकाळी ६ च्या सुमारास ते दक्षिणचीन च्या किनारपट्टीवर धडकले आहे. हैयान ३० ते ३५ किमी च्या वेगाने उत्तर पश्चिम दिशेकडे सरकत आहे. या भागात मुसळधार पावसाचा आणि वेगवान वार्याचा इशरा दिला गेला असून सम्रुदात मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांनी परत फिरावे असेही आदेश दिले गेले आहेत.