राज ठाकरे यांचे चित्रपट असोसिएशनला पत्र

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून चित्रपट व टिव्ही निर्मात्यांना होत असलेल्या हॅरॅसमेंट संबंधी खुलासा करणारे पत्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय चित्रपट व दूरदर्शन उद्योग समुहातील संघटनांना रवाना केले असल्याचे समजते.

या पत्रात राज लिहितात की अनेक चित्रपट व दूरदर्शन वाहिन्यांवरील निर्मात्यांना आमच्या पक्षाचे कार्यकर्ते त्रास देत असल्याचे, सेटची मोडतोड सारखे प्रकार करत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे येत आहेत. मात्र असल्या समाजविघातक व गुन्हेगारी घटनांत मनसे कार्यकर्त्यांचा सहभाग असलेच याची खात्री नाही. अन्य कांही जणही आमच्या पक्षाच्या नावाखाली असे प्रकार करत असावेत असा अंदाज आहे. कदाचित कांही घटनांत मनसे जबाबदार असेलही मात्र राज स्वतः चित्रपटाचे शौकीन आहेत, चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील अनेकांशी आमचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे आपल्याला आमच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही त्रास होत असेल तर त्वरीत आमच्या सचिवांशी संपर्क साधावा.कार्यकर्त्यांची असली वर्तणूक सहन करून घेतली जाणार नाही.

अंधेरीत मार्शल आर्ट सेटच्या शूटिगच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याप्रकरणात पोलिसांनी कांही जणांना अटक केली होती. त्यानंतर या कार्यक्रमाचे निर्माते राज कुंद्रा व त्यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी असे पत्र लिहिले असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment