युवराज चार्ल्स व कामिला यांची वॉरसिमेट्रीस भेट

पुणे, – एका शतकापूर्वीच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना प्रथमच बि‘टनच्या राजवंशातील व्यक्तीने येथील पहिल्या व दुसर्‍या महायुद्धातील युद्धस्मारकास भेट दिली. एकोणीसशे चौदासाली सुरु झालेल्या पहिल्या महायुद्धातील शहीद सैनिकांचे व दुसर्‍या महायुद्धात 1944पर्यंत शहीद झालेल्या सैनिकांचे येथे स्मारक आहे, त्याला बि‘टनचे युवराज चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवाल कॅमिला पार्कर यांनी रविवारी खडकी येथील वॉर सिमेट्रीला भेट दिली.

बि‘टनची राणी एलिझाबेथ दुसरी यांचा चिरंजीव युवराज चार्ल्स आणि डचेस ऑफ कॉर्नवाल कॅमिला पार्कर यांचे दुपारी दोनच्या सुमारास खडकी येथील सिमेट्री आल्या. त्याना भारत सरकारने उपराष्ट्राचा सुरक्षीततेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे पोलीस बंदोबस्त भक्कम होता. त्यांनी सिमेट्री ची पाहणी केली. त्यावेळी बि‘टनचे उच्चायुक्त कर्नल सायमन कॉयलर आणि लेफ्टनंट जनरल रवी यांनी सिमेट्रीबाबत युवराज चार्ल्स यांना माहिती दिली. युवराज चार्ल्स यांनी सिमेट्रीतील स्मृतीस्तंभाजवळ पुष्पचक‘ अर्पण केले.

युवराज चार्ल्स यांनी सिमेट्रीची देखभाल करणार्‍या व्यवस्थापक एम.एम.बहनवल यांच्याबरोबरच तेथील कर्मचार्‍यांशी संवाद साधला. आणि सिमेट्रीच्या नोंदवहीत त्यांनी आणिडचेस ऑफ कॉर्नवाल कॅमिला पार्कर यांनी स्वाक्षरी केली.

दुसर्‍या महायुद्धानंतर आठ वर्षांनी खडकी येथे 1952 मध्ये ही सिमेट्री उभारण्यात आली. येथे भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, इंग्ल्डं, न्यूझीलंड, कॅनडा, दक्षिण आफि‘केतील जवानांची स्मारके आहेत. कॉमनवेल्थ वॉर गि‘व्हिअर कमिशनमार्फत या सिमेट्रीची देखभाल केली जाते.

Leave a Comment