पुणे ः प्रतिनिधी पुणे बाजारात प्रथमच इजिप्तचा दहा टन कांदा दाखल झाला आहे. अवकाळी पावसाने अनेक ठिकाणच्या कांद्याच्या पीकाचे नुकसान झाले आहे. हा कांदा चारशे ग‘ॅम वजनाचा एक असा आहे. ते वजनात एका किलोला तीनच बसतात. सध्याच्या परिस्थितीत कांद्याने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले आहे. अशातच बाजारामध्ये इजिप्तच्या कांद्याची आवक झाल्याने ग‘ाहकांमध्ये कुतुहुलता निर्माण झाली आहे. बाजारामध्ये कांद्याचे व्यापारी गणेश रंगनाथ शेडगे यांच्या गाळ्यावर हा कांदा दाखल झाला आहे.
इजिप्तच्या कांद्याची सर्वसामान्य ग‘ाहकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. बाजारात आलेला कांदा हा थेट इजिप्तमधून आलेला नसून प्रथम तो मुंबई बाजारपेठेत व नंतर तो पुण्यात दाखल झाला आहे. सर्वसामान्य ग‘ाहकांकडून या कांद्याला मागणी नसली तरी हॉटेल व्यावसायिकांनी मात्र हा कांदा खरेदी केला आहे. साधारणतः या कांद्यामुळे ग‘ेव्ही अधिक होणार असून त्यामुळे या कांद्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. बाजारात आज मुंबई मार्केटमधून कांद्याची 10 टन आवक झाली असून प्रति दहा किलोला 500 रुपये भाव मिळाला आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून या कांद्याबाबत माहिती मिळाल्यानंतर या कांद्याबाबतची परिस्थिती कळू शकेल, अशी माहिती कांद्याचे व्यापारी सुर्यकांत थोरात यांनी दिली.
आज बाजारात सर्वसाधारण कांद्याची आवक 100 ट्रकची झाली असून हुबळी येथून 10 ते 12 ट्रकची आवक झाली आहे. बाजारात कांद्याची आवक वाढली असली तरी मागणी जास्त असल्याने दर मात्र दहा किलोमागे पन्नास रुपयांनी वाढले आहेत. आलेल्या कांद्याच्या दहा किलोला 250 ते 550 रुपये भाव मिळाला असून कर्नाटक, केरळ, आंध‘प्रदेश, तामिळनाडू, पंजाब व दिल्ली येथून मोठ्या प्रमाणावर कांद्याची मागणी वाढली आहे. परंतू बाजारात मध्यप्रदेश व गुजरातमधून येणार्या कांद्याची आवक कमी आहे. या ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसाचा मटका कांद्याच्या उत्पादनाला बसला आहे. तसेच जे छोटे छोटे कांदे आहेत त्यांचा सर्वात जास्त बियाणांसाठी वापर केला जात आहे. त्यामुळे महिनाभरामध्ये कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या आवा्नयात येतील, असा विश्वास कांद्याचे व्यापारी रितेश पोमण व सुर्यकांत थोरात यांनी व्य्नत केला.
आफि‘की देशातून कांदा प्रथमच भारतात येत आहे. सध्या त्याची नमुना म्हणून आवक सुरु आहे. पण येथील ग‘ाहकांना हा कांदा आवडला तर त्याची आवक वाढू शकते. अरब प्रदेशात व आफि‘की देशात कांदा हे महत्वाचे उत्पादन आहे आणि तेथील अनेक सरकारांनी कांद्यावर पोस्टाचे तिकिट काढले आहे.