पर्यटन संस्थेतर्फे केरळचा बहुमान

तिरुवअनंतपुरम् – पर्यटनविषयक माहिती प्रकाशित करणार्‍या लोनली प्लॅनेट या संस्थेने २०१४ साठी जगातल्या उत्तम पर्यटन स्थळांचे मानांकन प्रसिद्ध केले असून पहिल्या दहा उत्तम पर्यटन स्थळांमध्ये केरळचा समावेश केला आहे. कुटुंबासह भेट देण्यासाठी अतीशय उत्तम आणि सुरक्षित असे पर्यटनस्थळ असा या संस्थेने केरळचा गौरव केला आहे.

लंडनच्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट या पर्यटनविषयक जागतिक स्तरावरील महोत्सवात लोनली प्लॅनेट या संस्थेने हे मानांकन जाहीर केले. या महोत्सवाला जगभरातील नामवंत पर्यटन स्थळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गेले १० दिवस हा महोत्सव सुरू होता. या मानांकनामध्ये या संस्थेने केरळच्या पर्यटन विषयक वैशिष्ट्यांची चर्चा केली आहे.

केरळमधील हिरवाई, तिथल्या जीवनाचा संथ वेग, शांतता आणि कौटुंबिक वातावरण याशिवाय अधूनमधून हत्ती बघता येतील अशी जंगले, बीच वृक्ष आणि विस्तृत कालव्यांमधून होणारी बोटींग या गोष्टी पर्यटकांसाठी आनंददायी ठरतील असे या संस्थेने म्हटले आहे. केरळ सरकारच्या पर्यटन विभागाचे प्रतिनिधी म्हणून पर्यटन मंत्रालयाचे संचालक एस. हरिकिशोर हे या महोत्सवाला उपस्थित होते.

दक्षिण आफ्रिकेचा नामवंत क्रिकेटपटू जॉन्टी र्‍होडस् याने या महोत्सवातील केरळच्या दालनाला भेट दिली. केरळ पर्यटन विकास महामंडळाने हे दालन सजवताना केरळाचा उल्लेख होम ऑङ्ग आयुर्वेदा असा केला होता. जॉन्टी र्‍होडस् हा दक्षिण आङ्ग्रिकेच्या पर्यटन मंत्रालयाचा ब्रॅन्ड ऍम्बॅसिडर आहे. त्याने केरळाच्या पर्यटनविषयक सौंदर्याची प्रशंसा केली. केरळच्या दालनामध्ये १२ संस्थांचा समावेश होता.

Leave a Comment